
Pune : उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांकडून आता आयर्लंडला पसंती दिली जात आहे. आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या आता दहा हजारांच्या घरात गेली असून, त्यातील बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे आहेत. ‘एज्युकेशन इन आयर्लंड’च्या भारत आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक व्यवस्थापक बॅरी ओड्रिस्कोल यांनी ही माहिती दिली. एज्युकेशन इन आयर्लंडतर्फे पुण्यात हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयर्लंडमधील विविध विद्यापीठे, त्यात उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, व्हिसा प्रक्रिया, शिष्यवृत्ती या बाबतची माहिती देण्यात आली. पुण्यासह देशभरातील अन्य चार शहरांमध्येही असे कार्यक्रम होणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी जातात. त्यात आता आयर्लंडचेही स्थान उंचावत असल्याचे दिसून येत आहे.
ओड्रिस्कोल म्हणाले, ‘जगभरातून ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला येतात. त्यातील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आयर्लंडला पसंती दिली जात होती. मात्र, आता पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशही वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचा टक्का वाढू लागला आहे.
|
|
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान अशा विद्याशाखांतील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ अध्यापनासाठी विद्यापीठांमध्ये येतात. विद्यार्थ्यांना शिकतानाच काम करण्याचीही संधी मिळते. पदवीनंतर एक वर्ष आणि पदव्युत्तरनंतर दोन वर्षांचा व्हिसा वाढवून मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीही करता येते.’
‘शिक्षणासाठी आयर्लंडमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्यांचे पर्याय मिळतात. त्यात आयर्लंड सरकारची शिष्यवृत्ती, विद्यापीठांची शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचा समावेश आहे. त्याशिवाय गुणवत्तेनुसार शुल्कात कपातही केली जाते. विद्यार्थ्यांना शिकतानाच काम करण्याचीही मुभा असते. त्यामुळे सरासरी किमान २३ युरो प्रति तास या दराने वेतनही मिळते,’ अशी माहिती विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारत सरकारने आता परदेशी विद्यापीठांना भारतात शैक्षणिक केंद्र स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने आयर्लंडकडून या धोरणाचा अभ्यास सुरू आहे. काही विद्यापीठे भारतात येऊ शकतात. मात्र अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. आयर्लंडमधील विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार आहेत. त्या अंतर्गत प्राध्यापक देवाण-घेवाण केली जाते,’ असे ओड्रिस्कोल यांनी सांगितले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




