
Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि संकटमोचक म्हणून ओखळले जातात. राजकीय पेच, आंदोलने, नाराजीनाट्य असो किंवा विरोधकांची कोंडी करायची असो गिरीश महाजन आपल्या चातुर्याने सर्वांवर मात करतात. म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी त्यांची खास ओळख आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संकटमोचक गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले अन् थेट दुचाकीवर बसून पळ काढावा लागला. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप नेते गिरीश महाजन हे जळगावमधील जामनेर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. दोन दिवसांपूर्वी ते जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी या गावातील रस्त्यांची स्थिती फारच वाईट असल्याचे निदर्शनास आले. यावरुनच गिरीश महाजन यांना स्थानिक तरुणांनी जाब विचारला. तरुणांचा हा आक्रमकपणा पाहून गिरीश महाजन यांनी कोणतेही उत्तर न देता दुचाकीवर बसून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
दरम्यान, "ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला...' जामनेर तालुक्यात एकच चर्चा." असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केला आहे.
|
Pune : डॉक्टर अजित रानडेंना गोखले इन्स्टिट्युटच्या कुलगुरु पदावरुन तडकाफडकी हटवलं |
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदार संघामधील रस्त्यांची फारच वाईट स्थिती दिसून येत आहेत. याच खराब रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. मात्र, गिरीश महाजन त्यांना उत्तर न देता दुचाकीवर बसून याच चिखल असलेल्या खराब रस्त्यातून वाट काढत निघून जातात. गिरीश महाजन यांच्या या कृतीवरुन स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




