Pune : पुण्यात अवकाळी पावसाची दमदार एन्ट्री; अनेक भागांत गारपीट, उकाड्याने हैराण पुणेकरांना मोठा दिलासा

Pune : पुण्यातील वेगवेगळ्या भागांत सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने उन्हाची तीव्रता कमी झाली. औंध, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर या भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर इतर भागांत ऊन आणि ढगाळ वातावरण यांचा खेळ सुरू होता.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली होती. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पुणे शहरात सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. दुपारी २ च्या दरम्यान शहरातील काही भागांत हलका पाऊस पडला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि तापमानात थोडीशी घट नोंदवली गेली.

पुण्यातील बाणेरमध्ये गारांचा पाऊस तर पाषामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, याशिवाय बालेवाडी, म्हाळुंगेतही पाऊस सुरु होता. शहरातील मुख्य भागांसह सिंहगड रस्ता, लोहगाव, मुंढवा, केशवनगर कोरेगाव पार्क खराडी वाघोली, हडपसर, मांजरी, फुरसुंगी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान विभागानुसार, ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना, जोरदार वादळी वारे (३०-५० किमी/तास वेगाने), पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. १ एप्रिलपासून पावसाची तीव्रता अधिक वाढू शकते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *