
Mumbai : किंग्ज सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजेच ‘जीएसबी’ सेवा मंडळाच्या गणेशमूर्तीला यंदा ६६.५ किलोग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३२५ किलोग्रॅम चांदी, तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा साज चढविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘जीएसबी’ सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी तब्बल ४००.५८ कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. ‘द न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी’कडून मंडळाने हा विमा उतरवला आहे. गतवर्षी मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. यंदा मंडळाचे ७० वे वर्ष असून ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान ५ दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
‘जीएसबी’ सेवा मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, आचारी, चप्पल स्टँडवरील कामगार, सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी ३२५ कोटी रुपयांचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवला आहे. याशिवाय भूकंप आणि आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी २ कोटी रुपयांच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे. सोने, चांदी आणि दागिन्यांसाठी ४३.१५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. सार्वजनिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने मंडळ, मंडप आणि भाविकांसाठी ३० कोटी रुपये आणि आगीच्या बचावापासून व इतर धोके टाळण्यासाठी ४३ लाख रुपयांच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे.
|
|
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी जीएसबी मंडळाने शाडू माती, गवत व नैसर्गिक रंगांचा वापर करून गणेशमूर्ती साकारली आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी कागदी पावत्या वगळून मंडळाने डिजिटायझेशनचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच अन्नदान सेवेअंतर्गत दरदिवशी २० हजारांहून अधिक आणि पाच दिवस मिळून एक लाखांहून अधिक भाविकांना प्रसादाचे भोजन देण्यात येते, असे ‘जीएसबी’ सेवा मंडळाचे अध्यक्ष व प्रवक्ते अमित डी. पै यांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थापनाचा भाग म्हणून मंडपात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रथम दर्शनी चेहरा कैद करणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शिवाय भाविकांसाठी पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून ‘क्यू ऑर कोड’ स्कॅनिंगची व डिजिटल लाईव्ह यंत्रणा सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



