
Mumbai : बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना दुर्दैवी आहे परंतु घटनेच्या निषेधार्थ झालेले आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरित होते. आंदोलनात स्थानिक लोक असायला हवे होते. तिथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. बाकी सगळे आंदोलक बाहेरचे होते. इतर ठिकाणांवरून गाड्या भरून लोक येत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढूनही लोक ऐकायला तयार नव्हते. सरकारला बदनाम करण्यासाठी मंगळवारी बदलापूरमध्ये आंदोलन झाले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. चिमुरड्यांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? असा सवालही त्यांनी विचारला.
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
|
|
आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले?
आंदोलकांच्या मागण्या सरकारने मान्य करूनही ते रेल्वे रुळावरून उठत नव्हते. त्याचवेळी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? लाडकी बहीण योजना नको, लेक सुरक्षा योजना हवी, असे लोक कसे काय म्हणू लागले? याचाच अर्थ त्यांना, सरकारला बदनाम करायचं होतं, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
बदलापूरच्या आंदोलनात स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके, बाहरून गाड्या भरून भरून लोक येत होते!
जेव्हा कुठे आंदोलन होते तेव्हा तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. इतर ठिकाणांहून गाड्या भरुन भरुन आंदोलक आले होते. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागले असून ते यासंबंधी पुढील चौकशी करत आहेत. तब्बल ८-९ तास रेल्वे रोखणं हे देशाचे, रेल्वे संपत्तीचे नुकसान नुकसान असल्याची टिप्पणी त्यांनी केली. राजकारण करायला खूप गोष्टी आहेत, एका लहान बच्चूसोबत जे घडलं त्याचं तुम्ही राजकारण करता, ज्याने केलं त्याला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडले.
लाडकी बहीण योजनेचे नाव घेताना मुख्यमंत्री गडबडले
आंदोलकांच्या हातातील बॅनरवर असलेल्या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री गडबडले. लाडकी बहीण योजनेचे नाव घेताना त्यांची धांदल उडाली. लेक लाडकी... मुख्यमंत्री माझी लाडकी.. अशी चुकीची नावे घेऊन झाल्यावर सरतेशेवटी लाडकी बहीण योजनेचे नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




