Pune : नोकरी गेल्याने नैराश्य; मुंबईच्या युवकाचा पुण्यात टोकाचा प्रयत्न, एफ.सी. रोडवर आत्महत्येचा प्रयत्न

Pune : पुणे म्हणजे कायम गजबजलेलं शहर, पण या गजबजाटात कधी कधी मनाच्या आत चाललेलं वादळ कुणालाच दिसत नाही. असाच एक मोठा प्रकाराने काल शनिवारी रात्री एफसी रोडवरील खाऊगल्ली एक घटना घडली. काल शनिवारी रात्री सुमारे ९.१५च्या सुमारास सगळे नेहमीसारखे खाणं-पिणं एन्जॉय करत असताना अचानक एक गोंधळ उडाला. आदित्य सातपुते (वय ४१) नावाच्या इसमाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार इतका अचानक घडला की तिथे उपस्थित लोक काही क्षणांसाठी घाबरून गेले.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवलीचे रहिवासी असून सध्या पुण्यातील भोसले नगरमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती आणि त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. घटना घडताच आसपासच्या लोकांनी अजिबात वेळ न घालवता मदत केली. जखमी अवस्थेत असलेल्या आदित्य यांना लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, यामागे अजून काही कारण आहे का? याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एफसी रोडसारख्या कायम गजबजलेल्या ठिकाणीही अशा घटना घडू शकतात, याची जाणीव पुन्हा एकदा सगळ्यांना झाली. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनात काय सुरू आहे, हे समजणं किती गरजेचं आहे, हे या प्रकारातून समोर आलं.

व्यावसायिक स्पर्धेला भयानक वळण
एलपीजी सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची भाववाढ करण्यावरून झालेल्या भांडणातून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तिघांनी उपाहारगृहचालकासह त्याच्या सहकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी महर्षीनगर परिसरात घडली. या घटनेनंतर तिघे हल्लेखोर पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *