
Mumbai : मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्गाला चालना मिळत आहे. शुक्रवारी प्रभादेवी येथील लक्ष्मी निवास पाडण्यास सुरूवात झाली. या उन्नत प्रकल्पाच्या मार्गावर अनेक स्थानकांचे घरे, इमारती असल्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. पण लक्ष्मी निवासाच्या पाडकामासह पुनर्वसनातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून प्रकल्प मार्गी लागला आहे.
दोन इमारती पाडून उन्नत मार्ग
लक्ष्मी निवासामधील नागरिकांना यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आले असल्यामुळे इमारत रिकामी करून ती पाडणे शक्य झाले. यानंतर प्रकल्पाच्या मार्गावर असलेली हाजी नूरानी इमारतही लवकरच रिकामी करून पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही भाड्याच्या तात्पुरत्या खोलीत स्थलांतरित करण्या ऐवजी त्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्यात आले आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(MMRDA) सुरू आहे. त्यांना या रहिवाशांसाठी 90 कोटी खर्चून म्हाडाकडून घरे मिळवली आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारतीमधील सुमारे 75 रहिवाशांना स्वतःचं घर मिळालं आहे. लक्ष्मी निवास पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर तिथे पाडकाम सुरू केलं. परंतु, हाजी नूरानीमधील काही रहिवासी अद्याप बाहेर पडले नाहीत.
कसा असेल मार्ग?
हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अटल सेतूशी जोडणी असलेल्या या मार्गामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, या उन्नत मार्गासाठी प्रभादेवी येथे एक डबलडेक उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच 100 वर्ष जुन्हा प्रभादेवी (एलफिन्सटन) उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू झालं. या मार्गावर या दोन इमारती अडथळा ठरत होत्या. त्यामुळे येथील नागरिकांचं पुनर्वसन करून या इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कधी पूर्ण होणार मार्ग?
पुनर्रचित एल्फिन्सटन पूल सेनापती बापट मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाशी जोडणार आहे. या डबल डेकर उड्डाणपुलाचा एक भाग वांद्रे वरळी सी-लिंकला जोडणार आहे तर दुसरा भाग शिवडी येथे अटल सेतूला जोडे, जमिनीपासून 27 मीटर उंचीवर तयार होत असलेला हा पूल पूर्व द्रुतगती मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल आणि दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गिकांवरून जाणार आहे. हा संपूर्ण कॉरिडोर सप्टेंबर 2026पर्यंत पूर्ण करण्याची एमएमआरडीएने मुदत दिली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




