
Pune : राज्यात शनिवार, रविवारी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. पुण्यामध्येही रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहराभोवती पुन्हा जलवेढा पडला. गावांतील अंतर्गत रस्ते, पुलांवर पाणी साचले. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला. दुसरीकडे नाशिकमध्ये दोन दिवस पावसाची कृपावृष्टी झाल्याने पाणीचिंतेने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदी प्रथमच खळाळून वाहिली.
पुण्यातील धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. बहुतांश धरणे भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात आला. खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे २५ जुलै रोजी पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे रविवारी पुणेकरांना दिलासा मिळाला. ‘खडकवासल्या’तून ३५ हजार ‘क्युसेक’ने पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली होती.
|
Karjat : भीमा नदीला पूर आल्यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका |
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाथ्यावरील पाऊस पाहता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या होत्या. नदीकाठच्या रहिवाशांना शनिवारी रात्रीपासूनच अलार्म वाजवून काळजी घेण्यास सांगितले जात होते. नदीपात्रात रात्री २९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्यानंतर सकाळी ११ वाजता ३५ हजार क्युसेक्सने पाणीपुरवठा करण्याची सूचना देण्यात आली. एकतानगरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले.
या तुकडीतील १०० जवान, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक साधनांसह हजर होते. त्यांनी पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना घरे रिकामी करण्यास सांगितले. दुसरीकडे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये पुरामुळे दोन जण वाहून गेले, तर जळगाव जिल्ह्यातही तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मालेगाव येथे गिरणा पात्रात मच्छिमार अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
शहर
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- बीड: केजजवळ ओव्हरटेकचा थरार अन् ट्रॅक्टरसह दोन कारचा भीषण तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी,९ ऊस मजुरांचे टळले मोठे प्राणसंकट
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- कोल्हापूर: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाविरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक; पहिली उचल जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!




























Subscribe to my channel




