बीड: ऊसतोडणीच्या हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रात निघालेल्या मजुरांच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. केज तालुक्यातील साळेगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री ट्रॅक्टरसह दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. वाहनांचा वेग एवढा प्रचंड होता की तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे.
मागोमाग आलेल्या पांढऱ्या कारची धडक; मोठा अनर्थ टळला
काळी कार ट्रॅक्टरला धडकून रस्त्याच्या मधोमध आडवी पडलेली असतानाच, अवघ्या काही सेकंदांत कळंबकडून केजच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने (क्रमांक: MH 44 Z 5684) रस्त्यावरील आडव्या पडलेल्या कारला आणि ट्रॅक्टरला पुन्हा जोराची धडक दिली. एकापाठोपाठ झालेल्या या भीषण तिहेरी धडकेने महामार्गावर प्रचंड मोठा आवाज झाला. सुदैवाने ट्रॅक्टरमधील नऊ ऊसतोड मजूर या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.
केज पोलिसांची तत्परता; जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले
या अपघातात अशोक विठ्ठल शिंदे (वय २१, रा. कळंब) आणि ट्रॅक्टरचालक तरुण अभिषेक राजेंद्र शेळके (वय २०, रा. पहाडी हिवरा, ता. बीड) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. टी. (प्रल्हाद) चव्हाण आणि चालक शिंदे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तिन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक तात्काळ खुली केली. या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सांगितले.
शहर
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- कोल्हापूर: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाविरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक; पहिली उचल जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!


























Subscribe to my channel




