
Pune : सायबर गुन्हेगारांकडून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा आणखी एक गंभीर प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका 74 वर्षीय महिलेची तब्बल 45 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 नुसार भा.न्या.सं. कलम 318(4), 319 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे(वय 74, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला. संबंधित इसमाने स्वतःचे नाव संदीप पाटील सांगत तो पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं. त्याने पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांच्याविरोधात अटक वॉरंट असल्याचं सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ होईल अशी भीती दाखवत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या भीतीचा फायदा घेत आरोपीने त्यांना बँकेतील एफडी तोडण्यास भाग पाडले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितलं.
फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून 34 लाख 60 हजार रुपये आणि 11 लाख रुपये, अशी मिळून एकूण 45 लाख 60 हजार रुपये विविध बँक खात्यांवर वर्ग केले. काही दिवसांनंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी...
बारामती शहर पोलिसांनीनागरिकांना आवाहन केलं आहे की, 'कोणीही स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचं सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित संपर्क साधावा. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. अज्ञात व्यक्तींना ओटीपी, बँक तपशील, वैयक्तिक माहिती किंवा संशयास्पद लिंक देऊ नये'.
'सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये त्वरित तक्रार देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. वेळेत माहिती मिळाल्यास संबंधित बँक खात्यांवरील रक्कम गोठविणे करण्याची कारवाई शक्य होते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा', असं आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




