
crime incident in pune city : पुण्यात कधीही काहीही घडू शकते. अचानक रस्त्यावर भांडणे सुरू होतात. भांडणामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागतात. किरकोळ कारणावरून वाहनचालकांमध्ये वाद होतात आणि प्रकरण थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्यापर्यंत पोहोचते. रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीपर्यंत होते. शहरात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला गालबोट लागत असून, किरकोळ वादातून थेट खुनाचा प्रयत्न, मारामारी, खून अशा प्रकारच्या घटनांमुळे एकंदर समाजजीवनात वावरणे तितकेसे सोपे नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते अशा अनेक समस्या आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे. प्रत्येक चौकात पोलीस नेमणे परवडणारे नाही. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. वाहतूक कोंडी हा वेगळा विषय आहे. शहरात विकासकामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालणे देखील अवघड झाले आहे. वाहतूक कोंडी, समस्या हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, रस्त्यावर वाहनचालकांमध्ये वाद झाल्यास प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचते, हे बिघडलेल्या समाजस्वास्थ्याचे लक्षण आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.
|
|
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना विचारात घेतल्यास ‘वाटेवरती काचा गं’, अशी परिस्थिती आहे. कामाच्या व्यापात, धावपळीत असलेले वाहनचालक कधी हमरीतुमरीवर येतील, याचा नेम नाही. विश्रांतवाडी भागात नातेवाइकांच्या विवाहासाठी गेलेल्या मोटारचालक तरुणावर हाॅर्न वाजविण्याच्या वादातून पिस्तूल रोखण्याची घटना नुकतीच एका मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. मोटारचालक तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करण्यात आला. दैव बलवत्तर होते म्हणून तरुण बचावला. अशाच प्रकारची घटना पाषाण-बाणेर रस्त्यावर घडली. एका तारांकित हाॅटेलमध्ये व्यवस्थापक असलेली तरुणी दुचाकीवरून निघाली होती. भरधाव वेगाने तेथून मोटारचालक गेला. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. चिखल उडाल्याने पुढे जाऊन तरुणीने मोटारचालकाला मोटार हळू चालविण्यास सांगितले. ‘पावसाळ्याचे दिवस आहेत. खड्ड्यातून मोटार नेल्यास चिखल उडतो’, असे तरुणीने मोटारचालकाला सांगितले. त्यानंतर मोटारचालक भडकला आणि त्याने थेट दुचाकीस्वार तरुणीचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर दुचाकीला मोटार आडवी घालून मोटारचालकाने तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने थेट तरुणीच्या नाकावर ठोसा मारला आणि काही क्षणात तरुणी रक्तबंबाळ झाली. हे सगळे सुरू असताना मोटारचालकाच्या पत्नीने तरुणीला शिवीगाळ केली. या घटनेनंतर नागरिकांनी पकडून मोटारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:शृंगी पोलिसांनी मोटारचालक आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे प्रकरण ताजे असतानाच कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पुणे पोलीस दलातील पोलीस शिपायाला कर्तव्याचा विसर पडला. बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बस शेजारून गेल्याने चिडलेल्या पोलीस शिपायाने पीएमपी बसला दुचाकी आडवी घातली. भरस्त्यात पीएमपी थांबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ‘बस जोरात का नेली?’अशी विचारणा करून पोलीस शिपाई थेट बसचालकाच्या केबिनमध्ये शिरला. पीएमपी चालकाला पोलीस शिपायाने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीएमपी चालकाने मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला ‘माझी काय चूक झाली?’ अशी विचारणा केली. पोलीस शिपायाने पीएमपी चालकाची बाजू ऐकून न घेता त्याला मारहाण सुरूच ठेवली. पीएमपी बसमधील एका प्रवाशाने मोबाइलवर चित्रफीत काढून ती समाज माध्यमात प्रसारित केली. पोलीस शिपायाची मुजोरी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहाेचले. मात्र, पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी हे प्रकरण शांत केले. दोघेही शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्यातील वाद सामोपचाराने मिटला. पोलीस शिपायाने पीएमपी चालक आणि वाहकाची माफी मागितली. मात्र, समाज माध्यमात प्रसारित झालेली चित्रफीत पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस शिपायाचे कृत्य पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलीस शिपायाला निलंबित केले.
चार महिन्यांपूर्वी लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट परिसरातील अरुंद गल्लीत दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरून दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी थरकाप उडवणारी घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली होती. एका मोटारचालक तरुणाचा किरकोळ वादातून कोयत्याने वार करून टोळक्याने खून केला होता. मोटार खड्ड्यातून नेल्याने अंगावर चिखल उडाल्याने टोळक्याने तरुणावर हल्ला केला. पंचविशीत असलेल्या मोटारचालक तरुणाचा रस्त्यावर झालेल्या वादातून खून झाल्याने खळबळ उडाली होती. धकाधकीच्या जीवनात किरकोळ वाद होत असतात. एकेकाळी शांत शहर अशी ओळख असलेले पुणे आता महानगर झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे पुण्याच्या नावलौकिलाला गालबोट लागते. पुण्यात शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी स्थायिक होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, अनेकजण पुण्यात वास्तव्य करण्यास प्राधान्य देतात. मात्र, किरकोळ वाद जीवघेणे ठरू लागल्याने पुण्याच्या नावलौकिकाला बट्टा लागत आहे.
शहर
- पुणे: १ सप्टेंबरला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन! लक्ष्मण हाकेंची ‘चलो मुंबई’ची हाक; सरकारला दिला थेट इशारा
- पुणे: नवरात्रोत्सवात पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा; विद्या प्रतिष्ठानमधील 'प्रेरणास्थळा'चे करणार उद्घाटन
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- सांगली: महालॅबच्या चाचण्या बंद, गरिबांचा 'निदान' थांबला; रुग्णांच्या खिशावर हजारो रुपयांचा भार!
महाराष्ट्र
- पुणे: १ सप्टेंबरला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन! लक्ष्मण हाकेंची ‘चलो मुंबई’ची हाक; सरकारला दिला थेट इशारा
- पुणे: नवरात्रोत्सवात पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा; विद्या प्रतिष्ठानमधील 'प्रेरणास्थळा'चे करणार उद्घाटन
- सांगली: महालॅबच्या चाचण्या बंद, गरिबांचा 'निदान' थांबला; रुग्णांच्या खिशावर हजारो रुपयांचा भार!
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


























Subscribe to my channel



