
Sharad Pawar Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाकडून तोंडसुख घेतलं जात असताना आता खुद्द शरद पवार यांनीच राज ठाकरेंना टोला लगावला आहे. शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंना लगावला टोला!
शरद पवारांनी यावेळी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत विचारणा केली. ‘राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना सत्तेत बसवल्याशिवाय थांबणार नाही’, असं म्हटल्याचं शरद पवारांना माध्यम प्रतिनिधींनी सांगितलं. त्यावर शरद पवारांनी सूचक हास्य करत मिश्किल टिप्पणी केली.
|
|
“राज ठाकरे असं बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. पण दुर्दैवाने लोकांनी राज ठाकरेंसारखी भूमिका घेतली नाही. लोकांनी त्यांना एकच जागा दिली”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील हे एकमेव उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.
अजित पवारांना केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार व इतर ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र, त्यातील काहीजण स्वगृही परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “अनेक लोकांना असं वाटतंय की एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला. योग्य रस्त्याने जावं. योग्य रस्त्याने जाण्याची मानसिकता कुणाची असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असं शरद पवार म्हणाले.
मात्र, अशी भूमिका सरसकट सगळ्यांच्या बाबतीत घेण्यास पक्षाची तयारी नसल्याचं शरद पवार म्हणाले. “काही लोकांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यावर सरसकट निर्णय घेण्याची आमची मनस्थिती नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते, एकत्र काम करण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांना कुणाचा फारसा विरोध असण्याचं कारण नाही. पण आमच्या काही घटकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, यावर आमची पक्षांतर्गत चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं त्यांनी नमूद केलं.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



