
Pimpri Hit and Run : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या महिलेला उडवले. या अपघातानंतरही चालकाने कार तशीच पुढे नेली आणि रिक्षा व दुचाकीला धडक देऊन तो पसार झाला. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिंपरी गावात घडली. या घटनेनंतर काही काळ रस्त्यावर गोंधळ उडाला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपी कारचालक हरीश जालिंदर वाघमारे (रा. रहाटणी) याला अटक केली आहे. विजया नायर (वय ५५, रा. पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी शरण्या सौरभ तिवारी (वय ३१) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया नायर या शिक्षिका असून, दर रविवारी त्या मल्याळी मुलांना मल्याळम् भाषा शिकवतात. रविवारी क्लास झाल्यानंतर त्या वाघेरे कॉलनीतील शिवाजी पुतळा परिसरात पायी चालत जात होत्या. रस्त्यावरील केळीविक्रेत्याकडून त्या केळी खरेदी करीत असताना समोरून आलेल्या भरधाव कारने नायर यांना धडक दिली. त्यात त्या रस्त्याच्या बाजूला उडून पडल्या. तेथे लावलेली दुचाकी त्यांच्या अंगावर पडली आणि डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नायर यांना धडक दिल्यानंतर कारने एक रिक्षा आणि एका दुचाकीलाही धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला.
|
|
एका तासानंतर घेतली फिर्याद
या घटनेनंतर पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले आणि लवकर फिर्याद घेण्यात आली नाही, अशी तक्रार जखमी नायर यांची मुलगी शरण्या तिवारी यांनी केली. त्या म्हणाल्या, ‘दुपारी दीड वाजता माझ्या आईचा अपघात झाला. मी आईसोबत रुग्णालयात होते; त्यामुळे माझे पती फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, रक्तातील नात्याच्या व्यक्तीने फिर्याद देणे गरजेचे आहे, असे सांगून फिर्याद घेण्यात आली नाही. त्यानंतर साडेपाच वाजत मी फिर्याद देण्यासाठी गेले असता, सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर बोलत असताना पोलिस चिडले. सुमारे एक तासानंतर माझी फिर्याद घेण्यात आली.’
आरोपीला पिंपरीतून केली अटक
सीसीटिव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले. गाडीच्या नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करून तत्काळ गाडीचा शोध लावला. कारचालक पिंपरीतच लपून बसला होता. पोलिसांनी त्याला अटक केली.
अपघाताची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालकाला पकडण्यासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
शहर
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
महाराष्ट्र
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


