
Devendra Fadnavis : नाशिकमधील पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती. यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतले. आता या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं. ज्याने ते प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.
|
Gondia Politics : 'देवेंद्र फडणवीस यांनी फोन उचलला नाही म्हणून मी भाजप सोडली' |
चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त
ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे. काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे. पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे. ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे. त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे.
पूर्व वैमनस्यातून हे पत्रक काढल्याची माहिती
सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी पूर्व वैमनस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे. मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का? याचाही शोध घेतला जात आहे. यापुढे देखील, असे प्रयत्न होऊ शकतात. पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर ते पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमज निर्माण करून दंगलसदृश्य स्थिती निर्माण करायची, असे यापुढेही होऊ शकतं. म्हणून गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे.
...तर समाजात तेढ निर्माण होईल
पोलीस महासंचालक आणि एसआयडीला वस्तुस्थिती सांगितली आहे. काही राजकीय नेत्यांनी काल ते पत्र ट्विट केलंय. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल. कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आले, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

