
Sangli Crime : येथील शंभर फुटी रस्ता परिसरातील हँग ऑन कॅफेतअल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्यावर गुन्हा नोंद केला. विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली. दरम्यान, आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.
या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शहरातील कॅफे शॉपमधील अश्लिल प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली. आज संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 100 फुटी रोडवर असलेले एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले. सध्या पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
|
|
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी संशयित आशिषसमवेत तिची ओळख झाली होती. पीडित शिक्षणासाठी शहरातील वसतिगृहात राहते. एप्रिल २०२३ पासून पीडित शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करीत होता. पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तो सतत तिला मेसेज करीत होता. पीडितेने याला विरोध केला होता.
यावरून संशयित आशिष याने पीडितेस धमकावले होते. २२ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित आशिषने पीडितेस त्याच्या दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले. तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वत:च्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संशयित आशिष यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
कॅफे शॉपविरोधात शिवप्रतिष्ठानचे आंदोलन
शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लिल चाळे करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. दरम्यान, पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




