
Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये हा नक्षल चळवळीला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नक्षलचा हिंसक मार्ग सोडून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन प्रशासन करत असताना सुरक्षा दलाच्या नक्षल विरोधी कारवाईला मोठे यश आले आहे.
विशेष बाब म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या 9 नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बिजापूरमध्ये जानेवारी 2024 पासून आतापर्यंत एकूण 180 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यातील 76 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत अनेक चकमकीत तब्बल शंभरहुन अधिक नक्षल्याचा खात्माही केलाय.
|
|
नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आता पर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधाळून अनेकांचा खात्मा केलाय. अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे.
कतरंगट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
नुकतेच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या माहिती मिळाली होती. मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने या जंगल परिसरात पाठवण्यात आले.
दरम्यान हे अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुर केला. त्यानंतर पोलीस आणि नक्षल्यामध्ये काही काळ चकमक झाली. या दरम्यान संधी मिळताच पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जावानांनी प्रत्युत्तरादाखल आणि स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
तीन जहाल माओवाद्यांचा खात्मा
दरम्यान, पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबवली असता, परिसरात तीन जहाल माओवाद्यांचे मृतडेह आढळून आले. मारल्या गेलेल्या या माओवाद्यांमध्ये एक डीव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य आणि एक दलम सदस्य यांना ठार करण्यात यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 22 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. घटनास्थळावरुन पोलिसांना तीन ऑटोमॅटीक शस्त्र आणि इतर साहित्य आढळून आले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



