Nandurbar News : नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा छापा, दाेन शासकीय अधिका-यांसह एकास घेतलं ताब्यात

Nandurbar News : नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाचलुचपत विभागाने पन्नास हजार रुपयांची लाच घेताना दाेन दिवसांपूर्वी अटक केली हाेती. हे प्रकरण ताजे असतानाच नवापुर सीमा तपासणी नाक्यावर रात्रीच्या सुमारास एसीबीने छापा टाकला. या छाप्यात दाेन शासकीय अधिकारी व एका नागरिकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईची चर्चा नवापूर शहरातील चाैकाचाैकात तसेच परिवहन कार्यालय येथे आहे.

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुली सुरू असल्याची तक्रार एसीबीकडे तक्रारदाराने केली होती. त्यानुसार ठाणे विभागाच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यानंतर एसीबीकडून ताब्यात घेतलेल्या तिघांची रात्री उशिरापर्यंत नवापूर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली.

Swine Flu In Maharashtra : स्वाईन फ्लूचा महाराष्ट्रात शिरकाव, मालेगावमध्ये दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये घबराट

दरम्यान नवापूर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई दरम्यान जमलेल्या जमावाकडनं जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला गेला हाेता. त्याच पार्श्वभूमीवर नवापूर सीमा तपासणी नाक्यावर देखील याची पुनरावृत्ती होताना दिसून आली. नवापूर आरटीओ कार्यालयाच्या बाहेर चोर चोर असे नारे देण्यात आले याची चर्चा शहरात सुरु आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *