
Akola Crime : पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाली. त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून अमानुषपणे कृत्य केलंय. या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठलं. यानंतर चौकशी समिती बसली. या प्रकरणात मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतल.
|
Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग, 4 जण अडकल्याची भीती |
कुटुंबियांनी काय म्हटलेय तक्रारीत?
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे आणि इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारीला पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घर झड़ती घेतली. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील आकाश नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

