Devendra Fadnavis : PM मोदींना राज ठाकरेंनी दिला बिनशर्त पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : आज मनसेचा शिवतीर्थावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिकिया देत राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Raj Thackeray On BJP : भाजपला माझा सपोर्ट का?, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

देवेंद्र फडणवीस ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.'' 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *