
Wardha News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंना उमेदवारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमर काळे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
अशातच येत्या दोन एप्रिल रोजी अमर काळे हे इंडिया अलायन्सच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या करीता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अमर काळेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी वर्ध्यात उपस्थित राहणार आहे.
|
Hingoli News : महायुतीत मिठाचा खडा! हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा; भाजप आमदारांची मागणी |
वर्धा मतदारसंघात मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांची अधिसुचना जारी करण्यात आली असून यात विदर्भातील बुलढाणा , अमरावती , वाशिम, यवतमाळ , अकोला , आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच पक्षानी मतदारसंघात आपला प्रचार-प्रसाराचा धूरळा सुरू केला आहे. अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होतानाचे चित्र आहे.
शरद पवारांच्या उपस्थित अमर काळेंचा उमेदवारी अर्ज
या मतदारसंघात भाजपने सलग तिसऱ्यांदा विद्यामन खासदार रामदास तडस यांना संधी दिली आहे. इंडिया अलायन्सच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत सहज जिंकणे कुणालाही शक्य होणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अमर काळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे.
रामदास तडस विरुद्ध अमर काळे असा रंगणार सामना
महायुतीमध्ये भाजपकडून सलग तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणारे खासदार रामदास तडस हे येत्या 3 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे येत्या 2 एप्रिला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला शह देण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहे. इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार असून देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी आपले लोकसभा हे टार्गेट असल्याचे मत अमर काळेंनी बोलतांना व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



