
Uttar Pradesh Crime News : गाझियाबादमध्ये बनावट औषधांचा कारखाना पकडला गेला आहे. औषध विभागानं घटनास्थळावरून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. ही बनावट औषधे नामांकित कंपन्यांच्या नावानं पॅकिंग करून विकली जात होती. गाझियाबादच्या राजेंद्र नगर आणि भोपुरा भागात ही कारवाई झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारखाना सील करून तपास सुरू करण्यात आला आहे.
दिल्लीजवळील गाझियाबाद येथील एका कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. येथे या एलईडी बल्ब कारखान्यात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अँटासिडची बनावट औषधे तयार करून बाजारात विकली जात होती. दिल्ली पोलिसांच्या 'क्राइम ब्रँच'ने या कारखाना आणि गोदामातून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.
|
|
बनावट औषधांच्या कारखान्यावर छापा या कारखान्यात ब्रँडेड औषधांची नक्कल करून बनावट औषधे बनवली जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मोठी बाब म्हणजे येथे तयार होणारी बनावट औषधे हैदराबादपर्यंत पुरवली जात होती. या कारखान्यात नामांकित कंपन्यांची बनावट औषधे मोठ्या प्रमाणात तयार होत होती. औषध विभागाच्या पथकाने लाखो रुपयांची बनावट औषधे बनवणारी उपकरणे, तसंच बनावट औषधं बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त केला आहे.
गाझियाबादमधील औषध विभागाला एका कारखान्यात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर 4 मार्चपासून मोठ्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून छापा टाकण्यात आला. गाझियाबाद ड्रग्ज विभाग, दिल्ली गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गॅस, शुगर, बीपी यांसारख्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बनावट औषधांचा साठा जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौहान नावाचा व्यक्ती हा कारखाना चालवत होता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. औषध विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गेल्या एक वर्षापासून बनावट औषधे बनविण्याचा कारखाना सुरू (Fake Medicines Business Busted) होता. आरोपींनी तळमजल्यावर एलईडी बल्ब दुरुस्तीचा कारखाना उभारला होता, तर वरच्या मजल्यावर बनावट औषधे तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं.
या छाप्यात लाखो रुपयांचा कच्चा माल, मशीन आणि बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपास पथकाने 14 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. औषध विभागाच्या पथकाने साहिबााबाद पोलिस ठाण्यात बनावट औषधे बनवणे, विक्री करणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर आशुतोष मिश्रा यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसीर, साहिबाबाद परिसरात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. बनावट औषधे बनविणाऱ्यांवर पथक नजर ठेवून होते. विभागीय अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा आणि साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या पथकासह सर्वेक्षण केलं. बनावट औषधे बनवणाऱ्या कारखान्यातून सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, ग्लेनमार्क या प्रसिद्ध कंपन्यांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



