Kashmir : देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. २०१९मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा काश्मीरसाठी खास असणार आहे. दौऱ्यात पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. तसंच सार्वजनिक सभेला देखील संबोधित करणार आहेत.
श्रीनगरमध्ये आज मोदींची सभा आहे. काश्मीरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रॅली असेल, यामध्ये २ लाखांहून अधिक लोक जमतील, असा दावा भाजपने केला आहे. पीएम मोदींच्या या रॅलीसाठी श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी रस्त्याने ७ किलोमीटरचा प्रवास करून श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये जाणार आहेत
|
|
.
बक्षी स्टेडियमवर जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी ६४०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी श्रीनगरमध्ये सुमारे १० हजार तिरंगी आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. श्रीनगरमध्ये छोटे रस्ते सील करण्यात आले आहेत. स्टेडियमबाहेर २४ तास अगोदर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
रॅली संस्मरणीय करण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनासोबतच भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. सर्वजण तयारीत व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि भाजप देशाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की, काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. अशा स्थिती पंतप्रधान मोदी काश्मीरसाठीही मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
श्रीनगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेपूर्वी काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन येत आहेत. यामध्ये स्थानिक लोकांना पंतप्रधानांच्या जाहीर सभेला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात आली आहे. टीव्ही९ ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI काश्मीरमधील मोबाईल आणि लँडलाईनवर पंतप्रधानांच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी धमकीचे कॉल करत आहे. काश्मीरमधील लोकांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून कॉल येत आहेत.
याबाबत सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या श्रीनगरमधील मुक्कामादरम्यान सर्व मार्गांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर त्यांच्या दौऱ्यादरम्यान लोकांची ये-जा टाळण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पाळत ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे, तर घटनास्थळाच्या सभोवतालच्या दोन किलोमीटरच्या परिसरात सुरक्षा दलांकडून पायी गस्त वाढवण्यात आली आहे. झेलम नदी आणि दल सरोवरात मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




