Maratha Reservation : फसवे सरकार; दोनदा रद्द झालेले आरक्षण पुन्हा दिले... विरोधकांचा संताप

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी  आज महत्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाले. मात्र या विधेयकावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. तसेच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोपही सरकारवर केला आहे.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया..

"आम्ही एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना दिले होते त्या प्रश्नाचा खुलासा करावा असे सांगितले होते पण त्यांनी ते केले नाही. यापूर्वी असे आरक्षण दिलेले होते ते रद्द झाले. पुन्हा मराठा सामाजाची फसगत केली आहे. हे १० टक्के आरक्षण देताना आधार कुठला हे सांगितले नाही. हे कायद्याच्या आधारे टिकणारे नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Maratha Andolan : 'सगेसोयरे' अंमलबजावणी व्हावी, धाराशिवमध्ये मराठा समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

फसवणूक करणारे फसवे सरकार...

"फडणवीसांच्या काळात जशी केवळ निवडणूक काढून घेतले होती तशीच आता निवडणूक काढून घेतली जात आहे. जे बॅनर आधीच लावले होते. हे जर मराठा समाजाला पटल तर ते बॅनर राहतील. नाही तर राहणार नाहीत. परिपत्रकानंतर गुलाल उधळले गेले. दोनदा रद्द झालेले आरक्षन पुन्हा दिले. आम्ही बोलायला गेले तर बोलू दिले नाही. फसगत करणारे फसवे सरकार आहे," असे आरोपहीविजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *