
Trainee IAS officer Pooja Khedkar : पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाचीसध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण देखील तसंच आहे. पूजा खेडकरची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमची जिल्हाधिकारी असणार आहेत. स्वतंत्र केबिन आणि कर्मचारी अशा मागण्यांवरून वाद निर्माण केल्यानंतर पुण्यात तैनात असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिची मध्य महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची मागणी
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकृत पत्रात म्हटले आहे की 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकरची तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. ती 30 जुलै 2025 पर्यंत तेथे सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करेल.
|
Andharban Jungle Trek : सुरक्षित पर्यटनाचा पॅटर्न 'अंधारबन जंगल ट्रेक' |
खेडकरने चमकेगिरी केल्याने तिची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणं, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याना व्हॉट्स अप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी तिने केली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा करत असल्याकारणाने तिची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.
त्याचबरोबर असा दावा देखील करण्यात आला आहे की, पूजाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता. तिथे तिने तिच्या नावाचा बोर्ड देखील लावली होता. पूजाच्या या वागणुकीबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यानी मुख्य अप्पर सचिवाकडे पत्र लिहित IAS पूजा खेडकर हिची तक्रार केली होती. ज्यामुळे आता तिची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.
कोण आहे पूजा खेडकर ?
प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत तिचा आखिल भारतीय क्रमांक ८२१ होता. तिने स्वतःला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ मिळावा
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात काय म्हटले आहे?
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या अहवालानुसार, 3 जून रोजी कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच खेडकरने त्यांच्याकडे स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि एक शिपाई देण्याची मागणी वारंवार केली होती.
तिला सांगण्यात आले की, तिला तिच्या प्रोबेशन कालावधीत या सुविधांचा अधिकार नाहीं, आणि तिला राहण्याची सोय केली जाईल. दिवसे यांनी जीएडीला दिलेल्या अहवालात खेडकरने पुण्यात प्रशिक्षण सुरू ठेवू देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढून टाकल्याचा आरोपही तिच्यावर आहे.
लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली त्यांची वैयक्तिक ऑडी कारही तिने वापरली, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. तिने तिच्या वैयक्तिक गाडीवर 'महाराष्ट्र सरकार' असा बोर्ड देखील लावला होता. नियमानुसार प्रशिक्षणार्थीना वरील सुविधा पुरविल्या जात नसून त्याला प्रथम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. पूजा खेडकरला हे विशेषाधिकार मिळाले नसतानाही तिने आपल्या कृतीतून प्रशासनात खळबळ उडवून दिली.
यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) निवृत्त अधिकारी असलेले वडील दिलीपराव खेडकर हे आपल्या प्रभावाचा वापर करून जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यावर मुलीने केलेल्या मागण्यासाठी दबाव आणत होते, असाही आरोप आहे.
पूजा खेडकर हिने तिच्या खाजगी वाहनावर लाल-निळ्या दिव्यांचा वापर केला होता, ज्याचा फोटो व्हायरल झाला होता आणि ती प्रकोशझोतात आली होती. याशिवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याही नकळत तिने त्यांच्या चेंबरवर कब्जा केला असावा, असा अंदाज आहे.
पूजा खेडकर ही २०२२ च्या बॅचची IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. तिने UPSC परीक्षेत 821 (Pwd-5) रैंक मिळवल्याचे सागितले जाते. ती पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाली होती. मात्र आता तिची वाशिम येथे बदली झाली आहे. तिच्या वडिलासोबत, पूजा खेडकरचे आजोबाही सरकारी कर्मचारी होते. तिची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या निवडून आलेली सरपंच आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून, तिच्या कायमस्वरूपी नियुक्तीपूर्वी तिने विविध विभागामध्ये काम करणे अपेक्षित होते.
नियुक्ती आणि प्रशासकीय नोकरी मिळण्याच्या संशयास्पद वागणुकीमूळे ती इंटरनेटवर पसरली आहे. 2 फेब्रुवारी 2022 रोजी पूजा खेडकरला नियुक्ती नाकारण्यात आली, त्यानंतर तिने दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले.
न्यायालयाने जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान चार वेळा तिची वैद्यकीय तपासणी केली. ती चारही वेळा हजर राहू शकली नाही आणि त्यामुळे न्यायाधिकरणाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. 2023 मध्ये, तिचे प्रतिज्ञापत्र अपंगत्व हक्क कायदा, 2016 अंतर्गत सादर केले गेले आणि परिणामी तिच्या नियुक्तीला पुढे जाण्यास मंजुरी देण्यात आली. यासंबधीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




