
Pune Crime News : पती दररोज जेवणात त्रुटी काढतो म्हणून पत्नीला राग अनावर झाला. याच रागातून तिने कांदा कापण्याच्या चाकूने पतीवर हल्ला केला. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नमिता (वय ३३) असं वार करणाऱ्या महिलेचं नाव असून श्रवण (वय ३३ ) असं जखमी झालेल्या पतीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने पती-पत्नी हडपसरमधील झेड कॉर्नर मांजरी परिसरात राहतात. त्यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते.
|
Pune News : प्रकाश आंबेडकर हाजीर हो…कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले समन्स |
पती श्रवण हा आपण बनवलेल्या जेवणाला नेहमीच नाव ठेवतो, असा राग पत्नी नमिताच्या मनात होता. गुरुवारी (१ फेब्रुवारी) नमिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक करीत होती. त्याचवेळी श्रवण हा कामावरून घरी आला. अजूनही जेवण का बनवलं नाहीस? असं म्हणत श्रवणने नमितासोबत वाद घातला.
दरम्यान, स्वयंपाक बनवल्यानंतरही श्रवण आणि नमितामध्ये वाद सुरूच होता. आजही तू चांगलं जेवण बनवलं नाहीस, असं म्हणत श्रवणने जेवणात त्रुटी काढली. याचा पत्नी नमिताला राग आला. याच रागाच्या भरात तिने कांदा कापणाऱ्या सुरीने श्रवणवर हल्ला केला.
या हल्ल्यात श्रवण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




