Pune Crime News : अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५९ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार; घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Pune Crime News : एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका ५९ वर्षीय व्यक्तीविरोधत अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रावेत परीसरातील एका अकॅडमीच्या संचालकानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. मी तुला फिजिकली डेव्हलप करेल, तू माझ्याशी रिलेशनशिप ठेव, अस म्हणत संचालकाने विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

 

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अकॅडमीचा संचालक आणि एका माजी विद्यार्थीनी विरुद्ध पॉक्सो बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीवर या आधी दहा वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केल्याने कारवाई झाली होती. त्यावेळी देखील त्याला पोलिसांनी अटक केली होती.

जेलमधून सुटल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्यान पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *