
Sunil Kamble : ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं अंगलट आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं होतं. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंम्मत होतीच कशी, असा सवाल विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
|
Sharad Mohol Dead : मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक; प्राथमिक तपासात हत्येचं कारण उघड |
गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील ससून रुग्णालयातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. भाजप आमदार सुनील कांबळे देखील कार्यक्रमाला हजर होते.
कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी देखील भाजप आणि महायुसरकार विरोधात टीका केली होती.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण देताना आमदार कांबले म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात मारली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहितीये.
शहर
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
- एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
महाराष्ट्र
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
- एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
- जळगाव: जिगरबाज तरुणाची बिबट्याशी झुंज! जामनेरमध्ये शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याला तरुणाने पकडले जिवंत.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!



























Subscribe to my channel


