
Chhatrapati Sambhajinagar : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेले सेवानिवृत्त प्राध्यापक अचानक गायब झाले. या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास लावून तांत्रिक तपास करून या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांनी बेपत्ता प्राध्यापकाचे अपहरण केले. तसेच प्राध्यापकाजवळील पिस्तुलाने त्यांच्याच डोक्यात गोळ्या घालून खून केला. प्राध्यापकाची माहिती मिळू नये, यासाठी प्राध्यापकाचे प्रेत गेवराई तांड्याच्या जंगलात पुरविल्याची माहिती दिली. मृत सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. अभिरिका अपार्टमेंट, ज्योतीनगर) असे आहे. या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राध्यापकाची Drishyam Style हत्या करणाऱ्यांचे नाव विशाल राठोड (वय २४), आकाश पवार (वय ३२), करण आडे (वय २२) अशी आहे.
काय आहे प्रकरण?
पाच फेब्रुवारी २०२६ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उस्मानपुरा भागातील ज्योतीनगर येथे अभिरिका अपार्टमेंट येथे राहणारे राजाभाऊ लोंढे हे हरविल्याची तक्रार त्यांचे भाऊ उत्तम लोंढे यांनी दाखल केली होती. या प्रकरणात पाच फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य दोन जणांसोबत पार्टीसाठी गेल्याची माहिती देण्यात आली होती. हरविलेल्या व्यक्तीबाबत तिघांनाही माहिती विचारली असता, त्यांनी राजाभाऊ लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचे सांगितले.
या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या तपासासोबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपासाचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने बेपत्ता राजाभाऊ लोंढे यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत असलेल्यांची चौकशी केली. विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य दोन जणांनी दिलेल्या माहितीची तांत्रिक तपास सुरू केला असता, शहरातील सीसीटीव्हीची पाहणी केली; तसेच राजाभाऊ लोंढे यांच्या बाबत माहिती जमा करण्यास सुरुवात केली.
या प्रकरणात तांत्रिक तपासणी केल्यानंतर विशाल राठोड सह अन्य साथीदार यांचा जबाब आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तफावत आढळली. या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण विलास आडे यांना ताब्यात घेतल्यानंतर राजाभाऊ लोंढे यांना पार्टीत दारू पाजून त्यांचे अपहरण करून त्यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी घालून खून केल्याची कबुली दिली. लोंढे यांचा खून केल्यानंतर त्यांचे प्रेत गेवराई तांडा येथील जंगलात पुरले असल्याची माहिती दिली.
‘खतरों के खिलाडी’साठी ५० लाख
सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले पुण्यात राहत होते. विशाल राठोड हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होता. ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा गेम शो तसेच ‘खतरों के खिलाडी’ असे शो तयार करण्याच्या नावाखाली विशाल राठोड याने लोंढे यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये घेतले होते. मात्र, शो प्रत्यक्षात सुरू होत नसल्याने लोंढे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता, अशीही माहिती तपासातून समोर आहे.
फार्महाऊसवरील पार्टीनंतर खून
विशाल राठोडला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने सांगितले की, लोंढे यांच्यासह मागील काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते. त्यामुळे तो त्यांना ठार मारण्याची संधी शोधत होता. पाच फेब्रुवारीला दौलताबाद येथे चौधरी फार्म हाउसवर असलेल्या पार्टीत त्याला संधी मिळाली. लोंढे यांना विशालने आणि त्याच्या साथीदारांनी खूप दारू पाजली. नंतर त्यांना ते शुद्धीत नसताना गाडीतून सोबत नेले. रेल्वे पुलाजवळ साजापूर शिवारात गाडी थांबवून पिस्तुलाने लोंढे यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांचा खून केला.
या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अभिजीत चिखलीकर यांच्यासह पोलिस हवालदार विजय निकम, विजय घुगे, राहुल बंगाळे, अभिषेक साठे, सागर शेंडे, महिला पोलिस अंमलदार पूजा भोसले, माया माळी, वनिता तुपे, चालक पोलिस हवालदार तात्याराव शिंगारे यांच्यासह उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे, पोलिस अंमलदार विलास कऱ्हाळे यांनी केली. राजाभाऊ लोंढे खुनाच्या प्रकरणात विशाल राठोड, आकाश राठोड आणि करण आडे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने तिघांनाही तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश दिले.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




