Nagpur Latest News : 'घटनेची चौकशी तीन स्तरांवर होणार', नागपूर स्फोट दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Nagpur Blast : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''ही दुर्दैवी घटना आहे. प्रचंड मोठा स्फोट झाला असून 6 महिला आणि 3 पुरुषांचा मृत्यू आहे.''

ते म्हणाले, ''घटनेची चौकशी तीन स्तरांवर होईल. पेट्रोलियम एक्सप्लोसिव्ह कडून बीडीडीएसकडून आणि पोलिसांकडून तीन वेगवेगळ्या चौकशी केल्या जाईल.'' मुख्यमंत्री म्हणाले, मृतदेह उद्यापर्यंत नातेवाईकांना सुपूर्त केले जाईल. घटनेबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण दिलं होतं की नाही, हे सर्व चौकशीत समोर येईल. 

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करावे, असे निर्देश दिले. उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *