
Ravindra Dhangekar : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले आहेत. ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवन गाठत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर, ललित पाटील यांना पंचतारांकित सेवा रोहित पाटील यांना दिली होती, संजीव ठाकूर यांना अटक करावी यासाठी रस्त्यावर आम्ही आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय संजीव ठाकूर यांना ज्यांनी-ज्यांनी फोन केले, कोण कोण यामध्ये होते त्या सगळ्यांची चौकशी व्हावी या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी मी आज अधिवेशनात अशाप्रकारे आलो असल्याचं धंगेकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. ससून रुग्णालयाच्या 'डीन'ने तब्बल नऊ महिने ललित पाटील याला पंचकारित सेवा दिली होती. यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवत आहोत. याप्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक देखील झाली आहे. मात्र संजीव ठाकूर यांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही. या मागणीसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरलो. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या प्रकरणात सरकारचं लक्ष गेलं पाहिजे आणि संजीव ठाकूर यांना ज्याज्या मंत्र्यांनी फोन केले त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असे धंगेकर म्हणाले.
|
|
पोलिसांना फोन करणाऱ्यांवर कारवाई करा...
तर, अनेकांची चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत 30 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पण संजीव ठाकूर यांना देखील अटक केली पाहिजे. तसेच त्यांना ज्यांनी-ज्यांनी फोन केले आणि ललित पाटील याला ससून रुग्णालयात ठेवण्यासाठी मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. तुरुंगात असताना डॉक्टरांना ज्यांनी फोन केले, तसेच ललित पाटीलला अटक केल्यानंतर पोलिसांना ज्यांनी फोन केले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.
हातात स्टेथोस्कोपचा, अंगावर एप्रन...
रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचल्यावर त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, त्यांच्या एप्रनवर "ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे" असे लिहण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरणात आक्रमक होणारे ललित पाटील आता अधिवेशनात देखील आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

