Kolhapur News : कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा संप; बस सेवा ठप्प

Kolhapur News : विविध मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) अचानक काम बंद आंदाेलन सुरु केले आहे. यामुळे 42 मार्गावरील बस सेवा ठप्प झाली आहे. परिणामी प्रवाशांचा खाेळंबा झाला असून इच्छितस्थळी जाण्यासाठी अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत निशिकांत सरनाईक (अध्यक्ष, केएमटी परिवहन इंटकं युनियन) ते म्हणाले रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, महागाई भत्ता वाढवून द्यावे या मागण्यांकडे युनियन सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी करीत आहे.

Chhagan Bhujbal Threat : मंत्री छगन भुजबळांना तरुणाने धमकावलं, सलग १२ मॅजेस पाठवले; पोलिसांत गुन्हा दाखल

या मागणीकडे काेल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले. यामुळे आजपासून कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. यामुुळे बस सेवा बंद झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *