
Mhada High Court : म्हाडानं पेशवाई कारभार करू नये, या शब्दांत कानउघडणी करत तब्बल 48 वर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला हायकोर्टानं गुरूवारी दिलासा दिला आहे. या कुटुंबाला तात्काळ घर देण्याचे आदेश देत ताबापत्र उद्या शुक्रवारी देत त्याची माहिती न्यायालयात सादर करा, अशी ताकीदच हायकोर्टानं म्हाडाला दिली आहे. या प्रकरणावरुन म्हाडाच्या कामकाजाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.
काय आहे प्रकरण
मुंबईतील मौलाना आझाद मार्गावरील 'झेनत मंझील' या इमारतीत रवींद्रचे गोरखनाथ भातूसे यांचे आजोबा जानू राहत होते. ही इमारत मोडकळीस आल्याने म्हाडाने साल 1975 मध्ये येथील रहिवाशांना वडाळा येथील संक्रमण शिबिरात घरं दिली होती. मात्र काही काळात त्या संक्रमण शिबिराची इमारतही मोडकळीस आली. त्यानंतर भातूसे तुटुंबाला तिथूनही काढण्यात आलं. मात्र, दुसऱ्या संक्रमण शिबिरात घर दिलं गेले नाही. त्यामुळे हे कुटुंब त्यांच्या मूळ गावी सातारा इथं निघून गेलं. पात्र असूनही घर न मिळाल्यानम रवींद्र यांनी ॲड. आकाश जैस्वार यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. ॲड. यशोदीप देशमुख यांनी रवींद्र यांची बाजू मांडली तर म्हाडाकडून ॲड. प्रकाश लाड यांनी युक्तिवाद केला.
|
Sanjay Raut : शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर प्रहार |
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गेली 48 वर्षे हे कुटुंब आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहे. रवींद्र यांचे आजोबा साल 1975 मध्ये त्यांच्या घरातून बाहेर पडले. तेव्हापासून ते संक्रमण शिबिरातच राहत होते, तिथंच त्यांचे निधन झाले. त्यानंतर तिथं रवींद्र यांच्या वडिलांचंही निधन झालं. दोन पिढ्या गेल्या तरी भातूसे कुटुंबाला त्यांच्या हक्काचं घर काही मिळालेलं नाही, हे अत्यंत चुकीचे आहे, असं मत हायकोर्टानं हे निर्देश देताना व्यक्त केलं.
भातूसे कुटुंब घरासाठी पात्र असूनही त्यांना इतक्या वर्षात घर मिळालेलं नाही. मोडकळीस आलेली इमारत पाडल्यानंतर पात्र रहिवाशांना घर देण्याची जबाबदारी म्हाडाची आहे. इतरांप्रमाणे भातूसे कुटुंबालाही त्यांच्या हक्काचं घर मिळायला हवं होतं. इतकी वर्षे हे कुटुंब हक्काच्या घरासाठी झगडत आहे. या कुटुंबाची आम्हाला फार खंत वाटते, असंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




