
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सिनेट निवडणूक मतदारयादी आणि निवडणुकीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने यावेळी दिला.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळांनी आक्रमक होत आज कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी मतदार नोंदणीसह मुंबई विद्यापीठाच्या काही निर्णयावर मनविसेने नाराजी व्यक्त केली. यावेळी शिष्टमंडळाने कुलगुरुंविरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना अटकाव केला.
|
Farmer Suicide : बँकेचे कर्ज कसे फेडायचे? मराठवाड्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या |
तुमचा पुतळा जाळू...
सिनेट निवडणुकीत नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून तुमचे पुतळे जाळू, असा मनविसेने कुलगुरूंना थेट इशारा दिला. यामध्ये मनसे नेते गजानन काळे, अखिल चित्रे ,सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, यश सरदेसाई यांनी कुलगुरू समोर या सगळ्या निवडणूक कार्यक्रमा संदर्भात जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला.
कुलगुरूंना कोण चालवते आशिष शेलार यांच्या पत्रावर तुम्ही सिनेट निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करता? असा सवाल मनविसे नेते गजानन काळे यांनी केला. विदूषकाचा मास्क आम्ही यासाठी दिले की कणाहीन असलेले कुलगुरू आम्ही पहिल्यांदा त्या विद्यापीठात पाहतोय. सत्ताधारी आणि आशिष शेलार यांच्या फोनवरून निर्णय होऊ नयेत. यापुढे आम्ही कुलगुरूंचा पुतळा विदूषकाचा मास्क घालून विद्यापीठ परिसरात जाळू असा इशाराही काळे यांनी दिला.
मतदार नोंदणी मध्ये सहज आणि सोपी प्रक्रिया असावी. पण मुंबई विद्यापीठ यामध्ये काही शिकले असे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. वर्षभरापासून सिनेट निवडणुकीचा गोंधळ मुंबई विद्यापीठात सुरू आहे. कोर्टाने नाक कापल्यानंतर पुन्हा एकदा मतदार नोंदणी करण्याचे काम करा असं मुंबई विद्यापीठ म्हणत असल्याचे काळे यांनी म्हटले. ज्यांच्या मतदार नोंदणी मध्ये कुठले आक्षेप नाही त्यांना पुन्हा एकदा मतदान नोंदणी का करायला लावली जाते? असा प्रश्न त्यांनी केला.
आधीची मतदार नोंदणी आहे तीच आता ठेवायला हवी. आम्ही एकूण सहा मागण्या समोर ठेवण्यात आलेल्या तीन मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केले असल्याची माहिती काळे यांनी दिली. तीन मागण्या संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू आहे.
मुंबई विद्यापीठ हे हास्यपीठ झाला आहे. रात्रीतून निर्णय विद्यापीठ घेत असल्याची टीका अखिल चित्रे यांनी केली. मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तर अशा प्रकारची कार्यपद्धत ठेवून मतदारांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचे काम विद्यापीठ करत असल्याचे त्यांनी म्हटले.
शहर
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




