
Satara Gas Cylinder : पहाटेची साखरझोप संपून उजडायला लागले होते, त्याचवेळी सहा वाजून ५१ मिनिटांनी कऱ्हाडच्या हद्दवाढ भागातील मुजावर कॉलनी, शांतीनगर, खराडे, रेठरेकर, शिक्षक आदी कॉलन्यांसह छत्रपती शिवाजी स्टेडियमचाही परिसर घरगुती गॅस सिलिंडरच्यास्फोटाने हादरला.
यात दोन लहान मुलांसह सात जखमी झाले, तर पाच घरांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. पोलिसांसह स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ मुबारक मुल्ला, सुलताना शरीफ मुल्ला, झोया शरीफ मुल्ला, राहत शरीफ मुल्ला असे स्फोट झालेल्या घरातील जखमींची नावे आहेत. त्यात शरीफ (वय ३५) ४० टक्के, सुलताना (३२) ६० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
|
Alibaug Crime News : जेवणावरून वाद अन् रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळलं |
त्यांची ११ वर्षांची मुलगी झोया आणि आठ वर्षांचा मुलगा राहतही जखमी आहे. ते भाजले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याशेजारी अशोक पनवार राहतात. स्फोटामुळे त्यांच्या घराला दणका बसला. त्या घराची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली सापडल्याने त्या घरातील श्री. पवार यांच्यासह त्यांची पत्नी शैलजा व अन्य एक दत्तात्रय खिलारे जखमी आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
समोर साईनाथ डवरी राहतात. मोलमजुरी करून जगणारे ते कुटुंब. त्यांच्या घरावर भिंत आदळल्याने त्या घराचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील सोफा, बॅरेल, संसारोपयोगी वस्तू सारे काही सिमेंटच्या भिंतींच्या ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाने घराच्या मागील अस्लम बाबूलाल पठाण यांचे स्वयंपाकघरही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहे.
मुल्ला यांच्या शेजारी राहणारे अशोक पवार यांच्या तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या इमारतीची भिंत स्फोटाच्या हादऱ्याने कोसळली. त्या खाली सापडलेले तिघे जखमी आहेत. पाच घरांचे २० लाखांहून जास्त नुकसान झाले आहे. जखमींचा जबाब घेऊन पोलिसांचा तपास सुरू राहणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
रोजंदारीवरील कुटुंबे रस्त्यावर
मुल्ला यांच्या घरासमोर राहणारे डवरी कुटुंब रोजदांरीवर जगते. साईनाथ डवरी, त्यांची पत्नी उषा व मुलगा रोहित असे तिघे तेथे राहतात. त्यांच्या घराचे १०० टक्के नुकसान झाले आहे. ते कुटुंबच रस्त्यावर आले आहे. डवरी कुटुंब आज त्यांच्या तेथून जवळच राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाकडे वास्तव्यास गेले आहे. दोन्ही रोजंदारीवरील कुटुंब स्फोटाने रस्त्यावर आली आहेत.
पुण्याची पथकेही दाखल
स्फोटाचा तांत्रिक व रासायनिक लॅबकडून अभ्यास होणार आहे, त्यासाठी पुण्याचे फॉरेन्सिक लॅबसह अतिरेकी विरोधी पथकही येथे दाखल झाले आहे. त्यांनी तेथील काही नमुने तांत्रिक व रासायनिक तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

