
Gadchiroli Talathi Drunk Viral Video: दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क सरकारी कर्मचारीच दारु ढोसून कर्तव्यावर येत असल्याचं उघड झालं आहे. कुरखेड तालुक्यातल्या सजा क्रमांक ८ सोनेरांगी येथील एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तलाठ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तलाठी महोदय चक्क दारू ढोसून कार्यालयात आल्याचं दिसून येत आहे. गंभीर बाब म्हणजे या तलाठ्याकडे परिसरातील काही शेतकरी सातबारा काढण्यासाठी आले होते. यावेळी सातबाऱ्यावर सही करतानाच तो खाली पडल्याचं दिसून येत आहे. किशोर राऊत असं या मद्यधुंद तलाठ्याचं नाव आहे.
|
|
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुक्यातल्या सजा क्रमांक ८ सोनेरांगी येथे किशोर राऊत हे तलाठी पदावर कार्यरत आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ते कार्यालयात मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत.
तलाठी महोदयच दारूच्या नशेत असल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शेतीसाठी लागणारे सातबारे तसेच दाखल्यांची कामे होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे देखील तक्रारी केल्या असून अजूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, बुधवारी सोनेरांगी गावातील काही शेतकरी शेतीविषयक कामासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असल्याने राऊत यांना सही करण्याची देखील शुद्ध नव्हती.
सही करता-करता अचानक राऊत हे जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video)समोर आला असून व्हिडीओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला जात आहे. या दारुड्या तलाठ्याला तातडीने निलंबित करा, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



