
Sharad Pawar Jalgaon Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जळगावमध्ये आज जंगी सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांची ही चौथी सभा असून जळगावमधील पहिलीच सभा आहे.
एकीकडे राज्यात पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, जालन्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार, या घटनांवरून राज्याचं राजकारणं ढवळून निघालं आहे. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या सभेआधी जळगाव राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतांचे बॅनर्स लावले आहेत. वाघ हा वाघ असतो तो कधीच म्हातारा होत नाही, सत्तेसाठी नाही साहेबांच्या सन्मानासाठी आम्ही सारे साहेबांच्या पाठीशी, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.
|
Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाला शरद पवारांचा विरोध; सांगितला नवा तोडगा |
राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सच्या माध्यमातून अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याने सध्या हे बॅनर्स शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, शरद पवार दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी नेते तसेच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे.
शरद पवार जळगावमध्ये येताच राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. जळगावातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागतची तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शरद पवारांच्या स्वागतासाठी तब्बल ५ ते ६ जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर शरद पवार यांना सहा क्विंटलचा हार देखील घातला जाणार आहे. दरम्यान, जळगावमध्ये पोहचताच शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘इंडिया’ हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलकांची माफी मागणं, लाठीमाराची कबुलीच असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
