
धुळे :स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत असून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन (15 August) साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात शहरात भाजपाच्या (BJP) वतीने तब्बल 1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील वातावरण देशभक्तीमय झाल्याचे पाहायला मिळाले. या मिरवणुकीत शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन उद्या 15 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अग्रसेन पुतळा येथून या रॅलीला सुरुवात होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयिन विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आवाहन केलेल्या मेरी मिट्टी मेरा देश' या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशी ठेवलेली पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान जवळपास 1111 मीटर लांबीच्या तिरंग्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. कुणी घरातून, कुणी बाल्कनीतून, कुणी खिडकीतून हा सोहळा अनुभवत होते. तसेच या सोहळ्यात लहान मुलांसह आबालवृद्धांनी देखील मोठा सहभाग घेतला. सकाळी शहरातील अग्रसेन पुतळा येथून रॅलीची सुरवात होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आलेला राष्ट्रध्वज विविध मान्यवरांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील विविध भागात तिरंगा रॅली
धुळे जिल्ह्यातील विविध भागात आज'माझी माती माझा देश' हे अभियान राबवण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात विविध मार्गावरून रॅली काढून देशभक्तीपर गीतांचा जागर करण्यात आला. सोनगीर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातून रॅली काढण्यात आली तर शिरपूर शहरात देखील हर घर तिरंगा तसेच तिरंगा बाईक रॅली उत्साहात पार पडली. या बाईक रॅलीमध्ये तरूणांसह तरुणींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. तसेच अनेकांनी देशभक्तिपर गीते सादर करून वातावरण देशभक्तिमय केले.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




