
Pune Crime : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. ही संतापजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात रविवारी (९ जुलै) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसमवेत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली.
|
Mumbai Crime : MPSC च्या क्लासमध्ये तरुणीचा विनयभंग; संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल |
तेथून हे दांपत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेनंतर तो तरुण पसार झाला. घटनेनंतर महिलेसह तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


