
Mumbai Rain Alert: उशीरा का होईना, अखेर पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली. दोन ते तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं.
मुसळधार पावसाने मुंबईच्या नालेसफाईचे मात्र तीनतेरा वाजवले. सायन सर्कल, अंधेरी सबवे आणि दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे. याशिवाय दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर सुद्धा पाणी साचलं आहे.
मुंबईत सायन किंग्जसर्कल येथील गांधी मार्केटमध्ये पाणी साचले. हा सखल भाग असल्याने येथे दरवर्षीच्या पावसांत पाणी साचते. यंदाही पहिल्याच पावसांत येथे पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी, रहिवाशांची धावपळ उडाली. पालिकेने पंप लावल्याने येथील काही वेळातच पाण्याचा निचरा झाला.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने वाहनधारकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी साधारण १५० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, असं असून सुद्धा मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबल्याचं चित्र आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिट पर्यत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याचा पावसात मुंबईकरांना लेटमार्क लागला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




