
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला जाणार असून प्रत्येक मिनिटाला ३५ ते ४० भाविकांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर भाविकांना पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी देवाचे सर्व राजोपचार बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढपूरात दाखल होतात. या भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं म्हणून २४ तास दर्शन सुरू करण्यात येतं.
उद्यापासून २४ तास दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. २० जून ते ७ जुलै दरम्यान भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे या काळात व्हीआयपी व ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे. आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते.
यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळं देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त पंढपूरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
आषाढी एकादशी कधीपासून प्रारंभ?
आषाढी एकादशीचा प्रारंभ २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण





























Subscribe to my channel



