उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; गंगा नदीत 40 जणांनी भरलेली बोट उलटली, 4 जणांना जलसमाधी

Ballia Boat Accident : उत्तर प्रदेशातील बलिया येथे सोमवारी सकाळी गंगा नदीत बोट उलटून मोठी दुर्घटाना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून या बोटीत जवळपास ४० हून अधिक लोक प्रवास करत होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान या घटनेत बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

बलिया येथे सोमवारी फेफना पोलिसस्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. येथे गंगा मदी माल्देपूर घाट येथून जात होती, ती नदीमध्ये उलटली. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर उपस्थितांकडून बोटीत ४० लोक होते असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *