
Beed : संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणाऱ्या वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात बीड पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथील वाघोली परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 40 दिवसांपासून फाटे फरार होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी
16 जानेवारी 2026 रोजी सचिन जाधवर कर्तव्यावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत. 17 जानेवारी रोजी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी फाट्याजवळ त्यांच्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्यावर गंभीर आरोप केले. फाटे हे अतिरिक्त पदभाराचा वापर करून सचिन यांचा मानसिक छळ करत होते, कार्यालयात त्यांचा अपमान करणे आणि काही विशिष्ट कंपन्यांची बेकायदेशीर कामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप मयुरी जाधववर यांनी केला.
अटकपूर्व जामीन फेटाळला होता
मयुरी जाधवर यांच्या जबाबानंतर 23 जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच प्रदीप फाटे फरार झाला होता. त्याने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याचा अर्ज फेटाळून लावला. आरोपी अटक होत नसल्याने पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठत होती.
कुटुंबीयांचे उपोषण आणि पोलिसांची कारवाई
आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मृत सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांनी 25 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. होते. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण लावून धरल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फाटे पुण्यात असल्याची माहिती मिळताच, पथकाने वाघोली येथे छापा टाकून त्याला जेरबंद केले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड, सपोनी बाळराजे दराडे, अशोक दुबाले आणि महेश विघ्ने यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. प्रदीप फाटेच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील कारागृह प्रशासनाचा कणाच खिळखिळा; १२ वर्षांपासून 'तुरुंगाधिकारी श्रेणी-२'ची भरती ठप्प, ७० टक्के पदे रिक्त!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'


























Subscribe to my channel


