पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुर झाले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहे. तालिबानच्या हल्लात 55 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानी शहरांवरही हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आमच्या हवाई दलाने आज सकाळी 11 वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हवाई हल्ला केला. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तालिबानचा इस्लामाबादपर्यंत हल्ला समोर आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील फैजाबाद शहराजवळील एका लष्करी छावणीवर हल्ला केला. त्याचबरोबर तालिबानने खैबर पख्तूनख्वा येथील नौशेरा येथील लष्करी बॅरेक आणि जमरुदमधील एका लष्करी तळावरही हल्ला केला. तसेच अफगाणिस्तानच्या हवाई दलाने अबोटाबादमध्येही हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान चिंतेत मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी इस्लामाबादसह फैजाबाद, नौशेरा कॅन्ट, जमरुद मिलिटरी कॉलनी आणि अबोटाबादजवळील लष्करी छावणीवर सकाळी 11 वाजता हल्ला करण्यात आला. या कारवाईत लष्करी तळ, कमांड सेंटर आणि मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानकडून देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी काल रात्री पाकिस्तानने काबुल, कंधार आणि पक्तिया येथे हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. तालिबानने केलेल्या या हल्ल्यात ड्रोनचा वापरही करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आग लागल्याचेही समोर आले आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने ही कारवाई देशाचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तालिबानने पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे लुटली समोर आलेल्या माहितीनुसार, दंगम जिल्ह्यातील बांशी भागात जोरदार चकमक सुरू आहे. पाकिस्तानी मिलिशिया तेथून माघार घेत आहेत. अफगाणिस्तानने नवपास चौकी ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी दोन पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. आणखी काही कारवायांमध्ये आणखी एका वृत्तानुसार, मुजाहिदीनने ताब्यात घेतलेल्या नवपास येथील चौकीवर दोन पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. आणखी काही कारवायांमध्ये अफगानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत केली आहेत. अनेक पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडल्याचीही माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

