कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!

कोल्हापूर: शहरातील एका इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाने १३ वर्षांच्या मुलीस पार्किंगमध्ये कुत्र्याचे पिल्लू दाखवतो, असे म्हणून बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.

हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित शंकरकुमार गुणगुन राय (वय ४०, रा. राजेंद्रनगर, मूळ: सोनपताही पोस्ट, मधुबनी, संपताही, बिहार) यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

सोमवारी सायंकाळी पीडित १३ वर्षांची शाळकरी मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळत होती. यावेळी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या शंकरकुमार याने तिला कुत्र्याचे पिल्लू दाखवतो, असे सांगून जवळ बोलवून घेतले, त्यानंतर एका कोपऱ्यात नेऊन कुत्र्याचे पिल्लू दाखवत असताना तिच्याशी असभ्य व अश्लील वर्तन केले.

तू दररोज या ठिकाणी कुत्र्याचे पिल्लू बघायला एकटीच ये, मैत्रिणींना आणू नकोस, माझा मालक माझ्यावर ओरडतो, असे शंकरकुमार याने पीडित बालिकेस सांगितले होते. पीडितेने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी रात्रीच राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित शंकरकुमार याला अटक केली.

वॉचमन ठेवताना खात्री करा

अपार्टमेंटमध्ये वॉचमन ठेवताना त्याची खात्री करावी, त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवावे, काही वॉचमन पार्किंगमधील वाहनातील इंधन काढून घेताना सापडले आहेत. तसेच पार्क केलेल्या वाहनांतील साहित्यही चोरल्याच्या घटना यापूर्वी इतर ठिकाणी घडल्या आहेत. परिणामी, वॉचमन शक्यतो स्थानिक असावा, त्याचा फोटो व त्याची सर्व माहिती, कागदपत्रांचे झेरॉक्स काढून घेणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे तपशील व पार्श्वभूमी

  • घटनाक्रम: सोमवारी सायंकाळी १३ वर्षीय शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळत असताना वॉचमनने कुत्र्याचे पिल्लू दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून कोपऱ्यात नेत असभ्य व अश्लील वर्तन केले.

  • आरोपीवर कारवाई: पीडितेच्या तक्रारीनंतर राजारामपुरी पोलिसांनी संशयित शंकरकुमार गुणगुन राय (वय ४०) याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

  • सुरक्षेचा इशारा: निवासी इमारती व सोसायट्यांनी वॉचमन किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची संपूर्ण माहिती, ओळखपत्र व पार्श्वभूमी पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *