पुणे: पुण्यात होणाऱ्या ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२६) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येत्या २८ ते ३१ जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे शंभरावे साहित्य संमेलन पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) या संमेलनाचे मुख्य आयोजक असून, समर्थ युवा फाउंडेशन सहआयोजक आहेत. संमेलनाच्या नियोजनाच्या दृष्टीने सोमवारी (दि. २३) मार्गदर्शक समितीची बैठक पार पडली, तर आज (दि. २४) साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. शेषराव मोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ आणि प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांची नावे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. दुसरीकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळातील बहुसंख्य सदस्यांनी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (पुणे), लेखक रमेश पतंगे (मुंबई) आणि लेखक, कादंबरीकार व प्रकाशक बाबा भांड (छत्रपती संभाजीनगर) यांची नावे सुचवली होती. यापैकी एका साहित्यिकाची निवड करून बहुमताचा आदर करावा, असे पत्र त्यांनी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे यांना पाठवले होते. मात्र, या सर्व चर्चांनंतर महामंडळाच्या बैठकीत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटली.
साहित्य संमेलन होणार; पण साधेपणाने
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आणि संबंधित विविध उपक्रमांसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने एकूण १८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. मात्र, राज्यातील दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर संमेलनासाठीचा निधी दुष्काळनिधीला वळवून संमेलन साधेपणाने आयोजित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या संमेलनाच्या नियोजित कालावधीतच पुण्यात 'पुणे ग्रँड टूर' हा उपक्रम देखील होणार असल्याने संमेलनाच्या तारखांमध्ये बदल होऊन त्या पुढे-मागे जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
लिंबाळे यांची पार्श्वभूमी
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी यापूर्वी २०१० मध्येही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. साहित्य आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून, १९८६ ते १९९२ या कालावधीत त्यांनी सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे शंभराव्या साहित्य संमेलनाकडे संपूर्ण साहित्यविश्वाचे आणि मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
महाराष्ट्र
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!



























Subscribe to my channel



