
Prayagraj Kumbh Mela : सोलापूर - प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पुणे मऊ आणि नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मऊ कुंभमेळा विशेष
०१०३३ कुंभमेळा विशेष ही गाडी ता. ९, १७, २२, २५ जानेवारी ५, २२ आणि २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. एकूण सात गाड्या आहेत. ०१०३४ कुंभमेळा विशेष ही गाडी ता. १०, १८, २३, २६ जानेवारी ६, २३ आणि २७ फेब्रुवारी रोजी मऊ येथून रात्री ११.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. एकूण सात फेऱ्या आहेत.
|
|
या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, तलवारिया, चनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चक्की मिर्झापूर, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड हे थाबे आहेत. या गाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डेस ब्रेक व्हॅन अशी आहे.
पुणे-मऊ कुंभमेळा विशेष
०१४५५ कुंभमेळा विशेष पुणे येथून ता. ८, १६, २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि २१ फेब्रुवारी रोजी मऊ येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. एकूण सहा फेऱ्या आहेत. ०१४५६ कुंभमेळा विशेष : ९, १७, २५ जानेवारी ७, ९ आणि २२ फेब्रुवारी मऊ येथून ११.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता पोहोचेल.
या गाडीला दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवाडिया छनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, मिर्झापूर, वाराणसी, शहागंज आणि आझमगड आदी थांबे आहेत. या गाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रश्रेणी/चेअर कार, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गाईस ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी आहे.
नागपूर - दानापूर कुंभमेळा विशेष
०१२१७ कुंभमेळा विशेष ही गाडी २६ जानेवारी ५, ९ आणि २३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११ वाजता पोहोचेल. ०१२१८ कुंभमेळा विशेष ता. २७ जानेवारी, ६, १० आणि २४ फेब्रुवारी रोजी दानापूर येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पोचेल.
या गाडीला नरखेड, आमला, बैतुल, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा हे थांबे आहेत. यागाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन अशी आहे.
कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक ०१०३३, ०१४५५ आणि ०१२१७ साठी विशेष शुल्कासह बुकिंग ता. २० डिसेंबर रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि तिकीट यूटीएसद्वारे बुक केले जाऊ शकतात. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




