पुणे: महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामे आणि पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना, खुद्द पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत थेट स्वतः रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली आहे. आयुक्तांच्या या थेट सहभागामुळे आणि दंडात्मक व निष्कासन मोहिमेमुळे महापालिका वर्तुळात आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फर्ग्युसन कॉलेज रोड (FC Road) आणि शिवाजीनगर परिसरातील गोखले रस्ता परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्वतः रस्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि थेट देखरेखीखाली 'जेसीबी' (JCB) आणि इतर अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.
२४ हजार ५०० चौरस फुटांवर धडक कारवाई
या धडक मोहिमेदरम्यान एफसी रोड आणि लगतच्या परिसरातील तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे, शेड, तसेच दुकानांचे बेकायदेशीर वाढीव भाग पूर्णपणे हटविण्यात आले. दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत अविरत सुरू होती. या मोहिमेत महापालिकेच्या पथकाने रस्त्यावरील अनधिकृत दुकाने, हातगाड्या, पथारीवाले आणि पदपथांवर कब्जा करून बसलेल्या साहित्यिकांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त केले.
काही चलाख व्यावसायिकांनी महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी व आपले साहित्य वाचवण्यासाठी विक्रीचे सामान नजीकच्या इतर दुकानांमध्ये आणि खोल्यांमध्ये लपवून ठेवले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची नजर चुकली नाही. त्यांनी साहित्य लपवून ठेवलेल्या त्या संबंधित खोलीची पाहणी करत थेट त्या खोलीलाच टाळे ठोकण्याचे आदेश दिले, ज्यामुळे विक्रेत्यांची दाणादाण उडाली.
आयुक्तांच्या धाडीमुळे पदपथ झाले मोकळे
महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरल्याची कुणकुण लागताच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच दहशत पसरली. कारवाई सुरू असल्याचा संदेश इतर व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्याने अनेक जण त्या भागात फिरकलेच नाहीत. परिणामी, मंगळवारी सायंकाळी नेहमी गजबजलेल्या आणि अतिक्रमणाने व्यापलेल्या या रस्त्यावरील पदपथ पूर्णपणे मोकळे झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित व मोकळा रस्ता उपलब्ध झाल्याने अनेकांनी प्रशासनाच्या या कठोर पावलचे स्वागत केले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेवर स्थानिक नागरिकांनी काही तांत्रिक मुद्देही उपस्थित केले आहेत. केवळ दुपारीच नव्हे तर अनधिकृत पथारी व्यावसायिक प्रामुख्याने सायंकाळी आणि विशेषतः शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतात, त्यामुळे या मोहिमेची व्याप्ती वाढवून ती नियमितपणे सरावित राबविली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, आयुक्तांच्या या दरडावणीनंतर पुणे शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
- ठाणे: कौशल्य मेडीकल फाऊंडेशनने केला अटी आणि शर्तींचा भंग; ठाणे महासभेत भाजपाचे गंभीर आरोप, महापौरानी दिले चौकशीचे आदेश!
महाराष्ट्र
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



