Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत.
लग्नासाठी निवडलेले ठिकाण अत्यंत खास आणि गोपनीय ठेवण्यात आले आहे. हा विवाह सोहळा ITC Mementos Udaipur येथे पार पडणार आहे. उदयपूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेले हे आलिशान रिसॉर्ट पूर्णपणे खासगी आणि सुरक्षित आहे. येथे 117 प्रायव्हेट व्हिला, नदी-तलाव, खासगी हेलिपॅड आणि संपूर्ण टेकडीवर पसरलेली मालमत्ता आहे. त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाण आदर्श मानले जाते.
मर्यादित पाहुण्यांची उपस्थिती
हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार असून सुमारे 100 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबीय आणि अगदी जवळचे मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. अंदाजे 50 जण कपलसोबत कमर्शियल फ्लाइटने उदयपूरला पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.
उदयपूर विमानतळावर आधीच कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. काही सेलिब्रिटी आणि व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्रीतील नामांकित कलाकार उपस्थित राहणार नसल्याचे समजते. तेलंगणातील काही नेते आणि काही दिग्दर्शक या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.
चाहत्यांना खास मान
रश्मिका आणि विजय यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावांचा संगम करून ‘VIROSH’ हे नाव वर्षांपूर्वी दिले होते. आता या दोघांनी आपल्या लग्नाला ‘द वेडिंग ऑफ VIROSH’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या भावनिक संदेशात त्यांनी चाहत्यांचे आभार मानत लिहिले की, ‘तुम्ही आम्हाला प्रेमाने ‘VIROSH’ हे नाव दिलंत. त्यामुळे आमच्या लग्नालाही हेच नाव देत आहोत. तुम्ही नेहमी आमच्यासोबत आहात.’
लग्न पूर्णपणे खासगी ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांसोबत समन्वय साधून संपूर्ण रिसॉर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ‘नो फोन, नो कॅमेरा’ पॉलिसी कडकपणे लागू केली जाणार असून कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. अलीकडेच रश्मिका आणि विजय उदयपूरकडे रवाना होताना विमानतळावर एकत्र दिसले होते. फॉर्मल लूकमध्ये ते दोघेही अतिशय आनंदी आणि उत्साही दिसत होते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




