महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी आणि मोले अबकारी तपासणी नाक्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; १३,०७० रुपयांची रोख रक्कम जप्त, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात!

देशभर सध्या 'दक्षता जागरूकता सप्ताह २०२६' (Vigilance Awareness Week 2026) साजरा केला जात असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) महाराष्ट्र-गोवा सीमेवरील अत्यंत महत्त्वाच्या अशा पत्रादेवी (Patradevi) आणि मोले (Mollem) येथील अबकारी खात्याच्या (Excise Checkposts) सीमा तपासणी नाक्यांवर अचानक छापे टाकले आहेत. या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे सीमा तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या कारवाईदरम्यान दोन्ही चेकपोस्टवरून एकूण १३ हजार ७० रुपयांची बेकायदा आणि विनाकारण गोळा केलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे सीमावर्ती भागातील महसूल व अबकारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चेकपोस्टवरील तपासणी आणि जप्त केलेल्या रकमेचा तपशील:

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसीबीच्या अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. मोले येथील अबकारी चेक पोस्टवर निरीक्षक सतीश गावडे यांच्या पथकाने, तर पत्रादेवी येथील चेक पोस्टवर निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या पथकाने ही अचानक तपासणी मोहीम राबवली. या तपासणीमध्ये:

  • मोले अबकारी चेक पोस्टवरून १०,५७० रुपये रोख, आणि

  • पत्रादेवी तपासणी नाक्यावरून २,५० रुपयांची रोकड, अशी एकूण १३,०७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीमा तपासणी नाक्यांवर चालक आणि प्रवाशांकडून वाहनांच्या प्रवेशासाठी बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याचे वारंवार व्हिडिओ व तक्रारींच्या माध्यमातून समोर येत होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दहा कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात, पणजी कार्यालयात समन्स:

छापा टाकल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या आणि ड्युटीवर असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेतले. ही रोकड नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कशापोटी गोळा करण्यात आली होती, याबाबत कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या सुमारे दहा जणांना पुढील चौकशीसाठी पणजी येथील एसीबी मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कठोर कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत आणि सीमा तपासणी नाक्यांवर नियमबाह्य वसुली करणाऱ्या वर्तुळात चांगलीच भीतीचे वातावरण पसरले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *