नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड

नाशिक: राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागील तारखांतील नियुक्त्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने अमोल कुलकर्णी आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना शुक्रवारी अटक केली. दोघांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नियुक्त्या; वेतनाच्या व्यवहारांची चौकशी
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मागील तारखांपासून झाल्याचे दाखवून मान्यता मिळविणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि त्याआधारे शासनाकडून वेतन मिळविणे, असे गंभीर आरोप या प्रकरणात आहेत.

शाळेत शिपाई असलेला कुलकर्णी मुख्य मध्यस्थ
अमोल कुलकर्णी हा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मागील आठवड्यात फेटाळल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याला इंदूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शालार्थ आयडी घोटाळ्याशी संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना यापूर्वीच अटक झाली होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *